औरंगाबाद: खदाणीत तुंबलेल्या पावसाच्या पाण्यात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नक्षत्रवाडी भागात घडली.
प्रदीप भगवान काजळे (वय ९ वर्ष), तुषार प्रकाश शिरसाठ (वय १० वर्ष) (दोघे रा.नक्षत्रपार्क, नक्षत्रवाडी ) अशी मृत मुलांची नावे आहेत. शुक्रवारी संध्याकाळी मृत तुषार आणि प्रदीप व इतर दोघे मित्र असे चौघे मित्र नक्षत्रवाडी भागातील खदाणीकडे फिरायला गेले होते. तेथे गेल्यावर पोहयच मोह न अवरल्याने तुषार आणि प्रदीप ने पाण्यात उडी मारली मात्र दोघेही पाण्याच्या वर आलेच नाही भेदरलेल्या दोन्ही मित्रानी तेथून पळ काढला. गावात कुणालाही काही सांगितले नाही.घरच्यांनी शोध घेतला असता दोघेही पाण्यात बुडल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले तो पर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती.या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेळायला गेले अन् घरी परतलेच नाही
स तुषार शिरसाठ हा संत कबीर शाळेत इयत्ता ५ वी वर्गात शिक्षण घेत होता. तर प्रदिप भगवान काजळे हा मुलगा इयत्ता ४ थीत शिकत होता. शाळेतून घरी आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ते खेळण्यासाठी घराबाहेर गेले. ते घरी परत आलेच नाहीत. तेव्हा नातेवाईकांनी सर्वत्र शोध सुरु केला. तेव्हा खदानी बाहेर या दोघांचे कपडे नातेवाईकांना सापडले. त्यानंतर खदानीत त्याचे मृतदेह आढळले.









